‘९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात’ ‘स्टोरीटेल’च्या ऑडिओबुक्सला साहित्यप्रेमींची दिलखुलास दाद!

224

-साहित्य नगरीत ‘स्टोरीटेल’ची पाच हजाराहून अधिक ऑडिओबुक्सचा खास साहित्य-रसिकांसाठी!
The गडविश्व
वर्धा, ५ फेब्रुवारी : स्टोरीटेलने मराठीतील पाच हजारांहून अधिक सर्वोत्तम पुस्तके ऑडिओ स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध करून देऊन मराठी भाषा संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यामुळे मराठी भाषिक आपल्या स्मार्टफोनवर जगात कुठेही, कितीही आणि कधीही मराठी भाषा ऐकू शकतात. आपल्या देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या अनेक महाराष्ट्रीयन सैनिकांनी आम्ही स्टोरीटेलच्या माध्यमातून मराठी भाषा ऐकतो आणि आम्हाला मातृभाषेतून संवाद साधण्याचा आनंद मिळतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वर्धा येथील ‘९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात’ ‘स्टोरीटेल’ने विशेष सहभाग घेत, ऑडिओबुक्सचे विशेष दालन भरविले होते. साहित्यप्रेमींनी दिलखुलास दाद देत स्टोरीटेलच्या तज्ञमंडळींसोबत हितगुज करून मनमोकळा संवाद साधला.
स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले, “९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन साजरे करण्यासाठी स्टोरीटेलने विशेष योजना तयार केली होती. या योजनेत पाच हजारांहून अधिक मराठी ऑडिओबुक्सचा खजिना या साहित्यप्रेमी, दर्दी रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.” स्टोरीटेलवर, अनेक भाषांमध्ये तसेच भारतात ११ प्रादेशिक भाषांमध्ये ‘ऑडिओबुक्स उपलब्ध असून वार्षिक वर्गणी 999/- आहे पण साहित्य संमेलनातील स्टाॅलवर वर्गणी भरणाऱ्यांसाठी स्टोरीटेलने 50% सवलत जाहिर केली आणि अवघ्या फक्त रू500/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकण्याचा आनंद रसिकांना दिला आहे. स्टोरीटेलवर अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.
डिजीटल तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माहिती आणि ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला झाला. सर्वसामान्यांच्या हातात स्मार्टफोन दिसू लागला आणि त्यातून आपल्या मातृभाषेतील साहित्य लोक वाचू, ऐकू आणि पाहू लागले. माहितीच्या या महाजालात मराठी ही जगातील आघाडीची भाषा ठरते आहे याचे कारण अनेक मराठी रसिक इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर करू लागले आहेत. स्टोरीटेलने गतवर्षी नाशिक येथे संपन्न झालेल्या साहित्यसंमेलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून साहित्य रसिक श्रोत्यांसोबत संवाद साधला. या खास काळासाठी विशेष सवलत योजना तयार करून रसिकांच्या आवडी निवडींचा धांडोळा घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद घडला. स्टोरीटेल विविध साहित्यकृतींच्या माध्यमातून साहित्यरसिकांसोबत संवाद साधण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे.
या प्रसंगी साहित्य रसिकांसोबत संवाद साधताना स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार म्हणाले, “मराठी भाषिकांनी माहिती व ज्ञान मिळवण्यासाठी मराठी भाषेतून आंतरजालातील सर्व व्यवहार केले पाहिजेत तर मराठी भाषा या नव्या डिजीटल युगात टिकेल, वाढेल एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर वापरली जाईल. मराठी भाषिक जगातील जवळजवळ सर्व देशांत पसरलेला आहे. परराज्यात किंवा परदेशात मराठी टिकवायची असेल तर या भाषेत ऐकले किंवा बोलले गेले पाहिजे.”

स्टोरीटेलवर अनेकानेक ऑडिओबुक्स ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here