जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा खुर्सा येथे पार पडले वार्षिक स्नेहसंमेलन

166

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

The गडविश्व
गडचिरोली, ५ फेब्रुवारी : गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा खुर्सा, केंद्र आंबेशिवानी येथे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वार्षिक व कला, क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आले. सदर स्पर्धा मध्ये शालेय खेळाडूनी कौशल्याचे प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांना बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या सांस्कृतीक कौशल्याचा विकास व्हावा, त्यांना कलेतून आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व विकास दाखविता यावा या करिता वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडास्पर्धेचे करण्यात आले.
कार्यक्रमचे उदघाटन सरपंच मंजुळा पदा व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश मंगर, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज उरकुडे यांच्या उपस्थिती मध्ये पार पडले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, रनिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आले तर १ फेब्रुवारी ला प्रश्नामंजुषा, वक्तृत्व स्पर्धा व रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या मध्ये विद्यार्थ्यांनी समूहनृत्य, लावणी, देशभक्ती गीत, विनोदी नाटिका सादर करून कलाविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे मुरकुटे, चापले, उपसरपंच विनोद रामटेके, माजी सरपंच संतोष तुलावी, पोलीस पाटील प्रशांत रामटेके, आकाश लाडवे, संतोष आंबोरकर सर्व शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भोयर ताई, पदाधिकारी पदा ताई, लता मोटघरे व इतर ग्रामपंचायत सदस्यगण, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वासलवार यांनी केले तर संचालन जगदीश मडावी सर यांनी केले.
वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीते करिताअविनाश येणप्रेड्डीवार, किशोर उईके, श्री जगन्नाथ हलमी सर, रोहित मेश्राम, आशिष आंबोरकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Guru Ravidas Jayanti 2023) (Pat Cummins) Thaipusam) (Steve Smith) (JEE Mains Answer Key 2023) (Chelsea) (PSG) vs Toulouse)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here