– राणी खोब्रागडे हिने पटकाविले ८६.४० टक्के गुण
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०१ : महिला सूर्य आदिवासी विकास शिक्षण संस्था निमगाव द्वारा संचालित गणेश अलंकार विद्यालय निमगाव येथिल इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून निकालाची उज्वल परंपरा शाळेने यावर्षी टिकवली आहे.
धानोरा तालुक्यातील निमगाव शाळेमधून १९ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्या १९ विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतुन प्रथम क्रमांक राणे लालाजी खोब्रागडे हिने ८५.४० गुण मिळवून शाळेतून प्रथम स्थान मिळवला आहे. शाळेतील १ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत असून १३ विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण आहेत तर पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च शिक्षण मंडळाने नुकताच आँनलाईन घोषित केला. त्यात शाळेने आपल्या उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा याही वर्षी जोपासली असून शाळेतील रितिक शिडाम, नृपिया सुरपाम याने द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले त्यांच्यावरती अभिनंदन याचा वर्षाव होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व आई वडील यांना दिले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #sscresult2024)