The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३१ : तालुक्यातील दुर्गम भागात अतिशय विपरीत परीस्थीत लहानपणीच वडीलाचा छत्र हरपलेला शैलेन्द्र मडावी या आदिवासी समाजातील तरूणाने उच्च शिक्षण घेत अकोला सारख्या शहरात विज्ञान विभागात साहायक प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली व गुरुवार ३० मे २०२४ रोजी गोंडवाना विद्यापीठाने त्याना आचार्य ही पदवी बहाल केल्याने ते समाजाकरीता भूषणावह ठरलेले आहेत.
शैलेन्द्र मडावी यांनी गडचिरोली जिल्हातील अत्यंत उपयुक्त खाद्य वनस्पतीचे अभ्यास करीत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे शोध प्रबंध सादर केला होता. अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. प्रशांत गावंडे यानी त्यांचा शोध प्रबंधास मान्यता प्रदान केली व गुरुवार ३० मे रोजी पत्रान्वे गोंडवाना विद्यापीठाने त्यांना आचार्य पदवी प्रदान केली. शैलेन्द्र मडावी यांनी विपरीत परिस्थितीत वडेगाव सारख्या दुर्गम भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शाशकीय शाळेत पूर्ण करीत नागपूर विद्यापीठातून वनस्पती शास्त्र विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेत तसेच नेट सेट परीक्षा उत्तीर्ण करीत अकोला येथील आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालयात साहायक प्राध्यापक पदावर रूजू झाले. त्यांची ही गगणभरारी आदिवासी तरूणा करीता प्रेरणा दायी आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #phd )