– धानोरा वासियांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : येथील विद्युत पुरवठा १ जून २०२४ ला सकाळी ७.०० ते २.०० या वेळात ट्रि कटिंग च्या नावाखाली खंडित करण्यात येणार होता. त्यामुळे धानोरा वासियांना वाढत्या तापमानाने नाहक त्रास सोसावा लागणार आहे. हि खंत लक्षात घेऊन धानोरा वासियांच्या वतीने ३१ मे २०२४ ला कनिष्ठ अभियंता धानोरा यांना निवेदन देवुन विद्युत पुरवठा खंडित करण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली.
वाढत्या तापमानाने माणसाचे शरीर उन्हाने तापत असताना अंगाची लाही लाही होत आहे. अशातच धानोरा येथील विद्युत पुरवठा ट्रि कटींग घ्या नावाखाली खंडित करण्यात येणार होता. खंडित विद्युत पुरवठा कार्यक्रम रद्द करून येतील विद्युत पुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी विद्युत मंडळ धानोरा यांना करण्यात आली आहे.
सध्या धानोरा चे तापमान ४५ अंश च्या वरील तापमान आहे. सर्वांच्या घरी लहान मुलं व म्हातारे लोक आहेत. भर उन्हाळ्यात तापमान सहन होत नाही. शरीरातुन घामाच्या धारा सुरू होतात. त्यामुळे धानोरा वासियातर्फे आपणास विनंती आहे की उद्या होणारी ट्री कटीचे काम पुढील काही दिवसांनी म्हणजे तापमान कमी झाल्यानंतर करण्यात यावे अशी धानोरावासीया तर्फे विनंती करण्यात येत आहे.
यावेळी निवेदन देताना जमीर अजीज कुरेशी, गणेश कुळमेथे, प्रेम उंदीरवाडे ,पुरुषोत्तम चिंचोलकर, भुषण भैसारे, मुकेश बोडगेवार, अमित शेंगर, विश्वजीत हलदर, सद्दम शेख, मिथुन मशाखेत्री, विजय साळवे, गौरव ठाकरे , कुंडू , स्वप्नील गणोरकर, आशिष शिडाम, नरेश चिमूरकर, अनवर नाथांनी, गोविंदा चौधरी आदि धानोरा वासियांच्या व तिने निवेदन देण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #dhanora )