गडचिरोली : देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सव असतांना ‘या’ कडे कोणाचेच लक्ष गेले नसेल काय ?

1202

The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : अयोध्या येथे २२ जानेवारी ला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानिमित्त देशभरात महोत्सवही साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले मात्र गडचिरोली शहर वासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सेमाना देवस्थान येथील श्रीराम दूत हनुमान यांच्या भव्य मूर्तीकडे कोणाचेही लक्ष गेले नसेल काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गडचिरोली शहरापासून चामोर्शी मार्गावर काही अंतरावर सेमाना देवस्थान आहे. या ठिकाणी रामदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची मूर्ती आहे. गडचिरोली शहर वासीयांचे ते श्रद्धास्थान सुद्धा आहे, शनिवार व मंगळावारी या ठिकाणी दर्भनाकरिता भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळते. काही वर्षापूर्वी या ठिकाणी बजरंगबली हनुमान यांची भव्य उभी मुर्ती स्थापन करण्यात आली. तसेच आता अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त देशभरासह गडचिरोली शहरात व जिल्ह्यात मोठ्या उत्साहात महोत्सव साजरा करण्यात आला. हजारो – लाखो रुपये खर्च करून विविध कार्यक्रमांचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले. मात्र गडचिरोली येथील सेमाना देवस्थानातील बजरंगबली हनुमान च्या भव्य मूर्तीकडे मात्र दुर्लक्ष होतांनाचे चित्र आहे. या मूर्तीच्या हनुवटी च्या खाली आणि हाताला मधमाश्यांचे पोळे लागल्याचे दिसून येत आहे, त्याठिकाणी मधमाशाही नाहीत, तर त्या मुर्तीचा रंग सुद्धा उतरत असल्याचे दिसून येत आहे, गत रामनवमीला अथवा हनुमान जयंतीला मूर्तीची रंगरंगोटी होईल असेल वाटले होते मात्र तसे झाले नाही व त्याकडे सेमाना देवस्थान कमिटीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अश्यातच आता अयोध्या येथे रामलल्ला च्या प्रतिष्ठापना निमित्त देशभरात महोत्सव साजरा करत असताना आतातरी सेमाना देवस्थान येथील हनुमानाच्या भव्य मूर्तीची रंगरंगोटी होणार असे वाटत होते मात्र आता सुद्धा तसे झाले नाही. त्यामुळे देशभरात रामलल्ला ची प्रतिष्ठापना होत असतांना गडचिरोलीतील रामाच्या दूताकडे दुर्लक्ष होत असे असे म्हणायला हरकत नाही. दोन-चार दिवसांपूर्वी शहरातील अनेक मंदिरांची लोकप्रतिनिधीनी स्वच्छता करत गाजावाजा केला. तर २२ जानेवारीला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले मात्र सेमाना देवस्थान येथील त्या हनुमानच्या मूर्ती कडे कोणाचेच लक्ष गेले नसेल काय ? मूर्तीची रंगरंगोटी करावे असे वाटले नसेल काय ? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here