गडचिरोली : “आंघोळीला गेला… परतलाच नाही!” गिझरच्या करंटने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : शहरातील कारगील चौक परिसरात एक हृदयद्रावक घटना शनिवार ४ मार्च रोजी घडली असून, गिझरच्या करंटचा जोरदार झटका बसून एका तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. जयंत मनोहर भांडेकर असे मृत युवकाचे नाव असून, ते ‘जयंत आटा चक्की’चे संचालक म्हणून परिसरात परिचित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री नेहमीप्रमाणे काम आटोपून जयंत भांडेकर घरी परतले. आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता गिझरमधून अचानक विद्युत प्रवाहाचा तीव्र झटका बसला. बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी पाहणी केली असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मनमिळावू व कष्टाळू स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या भांडेकर यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे घरगुती विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #BreakingNews #TragicIncident #ElectricShock #GeyserAccident #YoungManDead #AccidentalDeath #ShockingNews #SafetyAwareness #ElectricalSafety #IndiaNews #LocalNews #SadNews














