The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : जिल्हाभरात आपल्या विखुरलेल्या तेली समाजाला एकसंघात एकसूत्रात बांधण्यासाठी आणि समाजातील विविध विषयावर चर्चा २२ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडली होती. यामध्ये सर्वानुमते श्री संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव धुमधळाक्यात जयंती साजरा करायचे असे ठरविण्यात आले होते. याच अनुषंगाने रविवार २९ ऑक्टोबर २०२३ ला रविवारी ‘कार्यक्रमाची रूपरेषा” ठरविण्यासाठी नियोजनात्मक बैठक विश्राम गृह इंदिरा चौक गडचिरोली या ठिकाणी संपन्न झाली.
त्या बैठकीमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच बैठकीमध्ये संताजी जगनाडे महाराज उत्सव समिती जिल्हा गडचिरोली चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. श्री.संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव २०२३ हे रविवार १२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता संताजी भवन सर्वोदय वॉर्ड गडचिरोली येथे आयोजित करण्याचे ठरले. गडचिरोली जिल्ह्यातील तेली समाजबांधवांनी तसेच महिला व युवा वर्गाने मोठया संख्येने उपस्थित राहावे व सहकार्य करावे असे आवाहन श्री.संताजी जगनाडे महाराज उत्सव समिती जिल्हा गडचिरोली यांनी केले आहे.