गडचिरोली : उद्या राज्यस्तरीय तेली समाज वधू वर परिचय महामेळावा

809

– एक रुपयात ऑनलाइन नोंदणी करून राज्यस्तरीय तेली समाज वधु वर परिचय महा मेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १७ डिसेंबर : स्थानिक शिवपार्वती मंगल कार्यालय गडचिरोली येथे उद्या रविवर १८ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय तेली समाज वधू वर परिचय महामेळाच्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वधू-वर परिचय मेळाव्यात तेली समाज बांधव, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्याव असे आवाहन मेळावाचे आयोजक राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ब्युरो अध्यक्ष श्री द्वारकाप्रसाद सातपुते यांनी केले आहे
लग्न समारंभ जोडताना वधू वरचे परिचय होणे आवश्यक आहे, प्रत्येक मुला मुलींना असे वाटते की आपल्याला चांगले स्थळ मिळाले पाहिजे, आजचे युग ऑनलाईनचे युग आहे, अनेकजण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे, मात्र ऑनलाईन नाते जोडताना प्रत्यक्ष परिचय होणे गरजेचे आहे, मेळाव्यात वधू वर पसंती व्हावी आणि नाते जुळून यावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी वधू- वर किवा पालक वधु -वर च्या नावाने ॲप डाउनलोड करून मोफत नोदणी (रजिस्ट्रेशन) करून घ्यावे. नोदणी करण्यासाठी ऍप डाऊनलोड rashtriyatelisamaj.com (राष्ट्रीय तेली समाज.कॉम) तसेच wadhuwar.com (वधु वर.कॉम) दोनी ऍप मेळावा रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपयोगी आहे. तेली समाज मेळाव्यात राज्यातील तसेच बाहेर राज्यातील वधू-वर पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिचय मेळाव्याचे लाभ घेणार आहेत.
मेळावा आयोजक श्री द्वारकाप्रसाद सातपुते एकनिष्ठ समाजसेवी अनेक वर्षापासून समाजा करीता व अनेक समाजा करीता समाजकार्यात सतत सक्रिय असतात. सातपुते हे आरमोरी शहरातील प्रतिष्ठीत कपड्याचे व्यापारी आहे. व्यवसायासोबत समाज कार्य ही करत असतात. आज पर्यंत त्यांनी अनेक लग्न जुळली आहे. दरवर्षी ७० टक्के लग्न जुळतात, त्यांच्या कार्याची सर्वत्र स्तुती केली जात असून त्याचे कार्य २९ राज्यात प्रसिद्ध आहे. ते सर्वधर्म समभाव वधु वर सूचक आहेत, हजारोंच्या संख्येने रोज नोदणी, देवाण-घेवाण करत असतात हे तेली समाजात समाजकार्यात आदरणीय आहे.

ऑनलाईन नोदणी:- (रजिस्ट्रेशन) १०० टक्के मोफत आहे
9421854868, 8208274671
वधु वर play store वर rashtriyatelisamaj.com ऍप डाऊनलोड करून ऑनलाईन मोफत रजिस्ट्रेशन करावे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Naruto) (The Recruit) (Warhammer) (Bilawal Bhutto on Modi) (Avatar) (Vadhu Var) (Dwarkaprasad Satpute)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here