जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा च्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

385

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १८ डिसेंबर : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोराच्या विद्यार्थ्यांची नुकतीच एक दिवसीय शैक्षणिक सहल सालेभट्टी येथील नदीवर नेण्यात आली. विद्यार्थ्यांची निरिक्षण क्षमता वृद्धिंगत व्हावी व परिसराचे ज्ञान त्यांना परिसरातूनच मिळावे या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी पडत असल्याने लवकरच नद्या कोरड्या पडत असल्याने पाणी अडवणे व ते जिरवणे अत्यंत आवश्यक झाले आहे . ही काळाची गरज ओळखून शालेय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी सालेभट्टी नदीत वनराई बंधारा बांधून “पाणी अडवा – पाणी जिरवा ” या मोहिमेचा प्रत्यय आणून दिला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डाकराम कोहाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वनभोजनाची व्यवस्था केली.
याप्रसंगी प्रशांत साळवे, कु.रश्मी डोके, हरित सेना प्रमुख शंकर रत्नागिरी, प्रशांत तोटावार, कु.रेखा कोरेवार, विजय बुरमवार, प्रमोद सहारे,ओमप्रकाश देशमुख, कु.रजनी मडावी, कु .स्नेहा हेमके, अशोक कोल्हटकर, मोहन देवकत्ते, हरिश पठाण, कु.किरण दरडे इत्यादी शिक्षक, शिक्षिका तसेच कु. उमाराणी चेलमेलवार, बादल वरगंटीवार, जैराम कोरेटी,भालचंद्र कोटगले इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
सहल यशस्वी करण्यासाठी शाळेतील ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोलाची मदत केली.

(The Gadvishva) (Built Vanrai Dam Dhanora) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here