– १ क्लेमोर माईन्स व २ कुकर बॉम्ब नाश करण्यात यश
The गडविश्व
गडचिरोली, २३ मार्च : गडचिरोली पोलीस दलाने टीसीओसी कालावधीत नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला असून नक्षल साहीत्य जप्त १ क्लेमोर माईन्स व २ कुकर बॉम्ब नाश करण्यात यश प्राप्त केले आहे.
२२ मार्च २०२३ रोजीच सकाळी ०९:०० वाजताच्या दरम्यान वरिष्ठांच्या आदेशाने उपविभाग भामरागड अंतर्गत येत असलेल्या पोमकें धोडराज हद्दीमध्ये गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना मौजा नेलगुंडा गावास भेट देवुन गाव परिसर सर्च करीत गावातुन बाहेर पडत असतांना जवानांना गोंगवाडा रोडवर एक क्लेमोर माईन्स, महाकापाडी रोडवर एक कुकर बॉम्ब तसेच महाकापाडी पगदंडीवर एक कुकर बॉम्ब मिळुन आला. यासोबतच १ नग बॅटरी, १ नग क्लेमोर करीता वापरलेला ३ फुटाचा लोखंडी पाईप व ३ बंडल इलेक्ट्रीक वायर ७० मीटर लांबीचे इ. नक्षल साहीत्य हस्तगत करण्यात आले. तसेच दोन वेगवेगळ्या रस्त्यावर मिळुन आलेले २ कुकर बॉम्ब व १ क्लेमोर माईन्स हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवर नष्ट करण्यात आले असून, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन पुढील कारवाई सुरु आहे.
फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान नक्षली टीसीओसी कालावधी साजरा करतात. नक्षली शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर नक्षल्यांकडून नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक व बी. डी. डी. एस च्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी अभियानात सहभागी सर्व जवानांचे कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
(The gadvishva) (The gdv) (Gadchiroli police news) (naxal)