The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २३ मार्च : धानोरा येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने २३ ते २६ मार्च २०२३ दरम्यान ग्रामीण रुग्णालयात मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजतार्यंत करण्यात आले आहे.
आज २३ मार्च ला वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन समारोह, रुग्णांनी तपासणी, पश्चात रुग्णभरती तसेच दिव्यांग शिबिर तथा प्रमाणपत्राचे वाटप. २४ मार्च ला तपासणी व शस्त्रक्रिया, २५ मार्च ला तपासणी व शस्त्रक्रिया काँल्पोस्कोपी तपासणी (गर्भाशय कर्करोग तपासणी) मॅमोग्राफी (स्तनांचे कर्करोगाची तपासणी), २६ मार्च ला कुटुंब नियोजन, पुरुष नसबंदी तसेच इतर शस्त्रक्रिया व शस्त्रक्रिया पश्चात काळजी.
ग्रामीण भागातील रुग्णांकरिता विशेष तज्ञांच्या विनामूल्य सेवा, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, विविध आजारावर आरोग्य तपासणी व चाचण्या मोफत औषधी व उपचार शस्त्रक्रिया (सर्व लहान, मोठ्या शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसिल, विविध गाठीवर उपचार,दिव्यांग तपासणी शिबिर तथा प्रमाण पत्राचे वाटप करण्यात येणार आहे तरी याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धानोरा तथा तालुका आरोग्य अधिकारी धानोरा यांनी केले आहे.

(The gadvishva) (The gdv) (Gadchiroli dhanora)