गडचिरोली : नक्षली सामान ठेऊन निघून गेले, पोलिसांनी ते जप्त केले

165

– गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील घटना
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे पेंढरीपासून १२ किमी पूर्वेला) नक्षली असल्याची माहिती मिळाली. दरम्यान गडचिरोली पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली असता अभियान पथक ३० मार्च रोजी सकाळी ४५० मीटर उंच टेकडीवर पोहोचले त्यावेळी नक्षली हे नुकतेच सदर ठिकाणहून निघाले होते. सदर डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोध मोहीम राबविली असता त्याठिकाणी नक्षल्यांचे एक मोठा आश्रयस्थान आणि छावणी सापडली ती अभियान पथका द्वारे नष्ट करण्यात आली व सामान पोलिसांनी जप्त केले.
गडचिरोली पोलीस दलातर्फे मिळालेल्या माहितीनुसार, कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) तळ ठोकून आहेत अशी विश्वासार्ह माहिती २९ मार्च रोजी गडचिरोली पोलीस दलास मिळाली. माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकच्या जवानांद्वारे सदर जंगल परिसरात लगेच नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले. अभियान पथक ३० मार्च रोजी सकाळी ४५० मीटर उंच टेकडीवर पोहोचले त्यावेळी नक्षली हे नुकतेच सदर ठिकाणहून निघाले होते. सदर डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोध मोहीम राबविली असता त्याठिकाणी नक्षल्यांचे एक मोठा आश्रयस्थान आणि छावणी सापडली ती अभियान पथका द्वारे नष्ट करण्यात आली. सदर जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु अत्यंत खडतर प्रदेश आणि पर्वतांचा फायदा घेत माओवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
यावेळी घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटऱ्या, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक इत्यादींचा मोठ्या प्रमाणात माओवादी सामान आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

Naxal Camp busted by Gadchiroli Police on Gadchiroli – Chattisgarh Border

A credible Int was received late night on Friday that some armed cadres of Kasansur Chatgaon Dalam and Aundhi Dalam of CG are camping exactly on MH CG Border near Chutintola village (12 km east of SPS Pendhari) across Mohalla Manpur Distt. of CG to carry out subversive activities in wake of upcoming Lok Sabha General Elections.

Immediately an anti Naxal Ops was launched under leadership of Addnl SP Ops Yatish Deshmukh and and C60 units. They reached the hilltop 450 metres high yesterday morning from where Naxals had just left. A huge shelter and naxal camp was found at the place of search on hilltop which was destroyed and further search was launched. Naxals were able to flee the spot taking advantage of extremely difficult terrain and undulating mountains.

Large amount of naxal belongings and literature have been seized which includes cordex wire, detonators, gelatin sticks, batteries, walkie talkie chargers, backpacks etc . C60 units have safely reached back to Gadchiroli today. Anti Naxal ops have been intensified all along the Chattisgarh border.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here