कुरखेडा : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

1795

– देसाईगंज- कुरखेडा मार्गावर एच.पी पेट्रोल पंप समोरील घटना
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०१ : येथील देसाईगंज मार्गावर एच.पी पेट्रोल पंप समोर रधाव ट्रकने दूचाकी स्वाराला चिरडल्याची घटना ३१ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता कि मृतक दुचाकीस्वाराचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते. यशवंत नामदेव गहाणे (वय ५८)रा . अंगारा असे मृतकाचे नाव आहे.
दिपक ट्रान्सपोर्ट चा ट्रक नागपुर – कूरखेडा या मार्गावर नियमीत माल वाहतूक करतो. दरम्यान मृतक हा एम एच ३३ झेड ६१२४ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने अंगारा येथून मुलीच्या गावी ताडगांव येथे जाण्याकरीता सकाळी‌ निघाला होता. कुरखेडा- देसाईगंज मार्गावर असलेल्या एच.पी पेट्रोल पंप मधून त्याने वाहनात पेट्रोल भरले व कुरखेडा-देसाईगंज या मुख्यमार्गावर निघताच देसाईगंज कडून कुरखेडाकडे येणारा एम.एच ३१ सि. बी ८६३५ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली यावेळी दुचाकी हि ट्रकच्यासमोरील चाकात तर दुचाकीस्वार मागील चाकात सापडल्याने दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी घटणास्थळावर पोहचत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालयात पाठविले तसेच ट्रक जप्त करीत पोलीस स्टेशन कुरखेडा येथे जमा केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #desaiganj #accident #loksabhaelection2024 #gadchirolichimurloksabha)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here