गडचिरोली : शेतजमिनीच्या वादातुन हत्या, आरोपीस ७ वर्ष सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

1089

– प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश उदय बा शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
गडविश्व
गडचिरोली, 3 जून: शेतजमीनीच्या वादातुन हत्या करणाऱ्या आरोपीस ७ वर्ष सक्त मजुरी व २५ दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उदय बा. शुक्ल यांनी ठोठावली आहे. आसाराम बिजाराम कुमरे (३५) रा. कोटलडोह ता. कुरखेडा जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, यातील मृतक तुळजाबाई मंगु कल्लो (६०) मोहगाव ता. कोरची जि.गडचिरोली ही तीची मुलगी अनुसया वासुदेव कुमरे रा. कोटलडोह येथे आली असता. १८ जुलै २०२१ रोजी रात्रोच्या सुमारास आरोपी असाराम कुमरे याने तुळजाबाई कल्लो हिला शेतजमिनीच्या वादावरून लाकडी पाटी डोक्यावर, हातापायावर व पाठीवर मारहाण करत हत्या केली. याप्रकरणी मृतकाची मुलगी अनुसया कुमरे हिने पोलीस ठाणे पुराडा येथे तक्रार दाखल केली असता आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची पोलीस यंत्रणेने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी विरूध्द सबळ पुरावा मिळुन आल्याने मा. न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून शनिवार ३ जून २०२३ रोजी आरोपी आसाराम बिजाराम कुमरे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम ३०४ भाग – २ अन्वये ७ वर्षाची सक्त मजुरी व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सरकार पक्षातर्फे सहा जिल्हा सरकारी वकील एस.यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हयाचा तपास तत्कालीन पोउपनि दिपक अमोल शेळके पोलिस स्टेशन पुराडा व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त बबन भवर, कुरखेडा यांनी केले तसेच संबंधित प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.
(the gdv,the gadvishva, gadchiroli news, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here