४१ जणांनी घेतला गाव पातळी शिबिराचा लाभ

92

-तज्ञांकडून रुग्णांना समुपदेशन
The गडविश्व
गडचिरोली, ३ जून : दारुचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांना गावातच उपचार मिळावे यासाठी, मुक्तीपथ तर्फे गाव संघटनेच्या मागणीनुसार सदर गावात व्यसन उपचार शिबीर घेण्यात येते. नुकतेच मरकेगाव, आमगाव, पूनर या गावात आयोजित शिबिरातून एकूण 41 जणांनी उपचार घेतला. यावेळी तज्ञांनी योग्य समुपदेशन करीत दारूचे व्यसन सोडण्याचे आवाहन रुग्णांना केले.
धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथे एक दिवसीय गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये 8 पेशंटनी पूर्ण उपचार घेतला. पेशंटची नाव नोंदणी गौरव मंगर यांनी केली तर केस हिष्ट्री संयोजक प्रभाकर केळझळकर, शुभम बारसे यांनी घेतली. समुपदेशन व औषध उपचार समुपदेशक छत्रपती घवघवे यांनी केले. देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. यात नविन 6 जुने 7 असे एकूण 13 जणांनी पूर्ण उपचार घेतला. समुपदेशन प्राजू गायकवाड यांनी केले. केस हिस्ट्री नयना घुघुस्कर यांनी घेतली. शिबिराचे नियोजन आणि पेशंटची नोंदणी अनुप नंदगिरवार यांनी केले. एटापल्ली तालुक्यातील पूनर या गावामध्ये गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 20 रुग्णांनी नाव नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. यशस्वीतेसाठी गावातील गाव पाटील गोंगलू झोरे आणि आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले. शिबिरात रुग्णांची तपासणी व ग्रुप थेरपी पूजा येल्लुरकर यांनी केले. रुग्णांची केस हिष्ट्री दशरथ यांनी तर रवींद्र वैरागडे यांनी रुग्णांची नाव नोंदणी केली. शिबिराचे नियोजन रुणाली कुमोठी यांनी केले. अशा विविध गावात आयोजित शिबिरातून एकूण 41 रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here