– न्यायाधीशाशी वाद भोवले
The गडविश्व
गडचिरोली, ३ जून : विरोधात आदेश दिल्याने न्यायाधीशांशी वाद घालत धमकावल्या प्रकरणी वादात अडकलेल्या चामोर्शी येथील पोलिस निरीक्षक राजेश खांडवेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुढे येत असून न्यायालयीन कोठडी सुनावल्याचीही कळते तर त्याची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती आहे.
बाजार समिती निवडणुकीच्या दरम्यान २० एप्रिल रोजी पहाटे पोलीस ठाण्यात बोलुवून बेदम मारहाण केली असा आरोप सभापती अतुल गण्यारपवार यांनी पोलीस निरीक्षक खांडवे यांच्यावर केला होता. तसेच चामोर्शी मध्ये खांडवे विरोधात आंदोलनही करण्यात आले होते. गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी २० मे रोजी पो. नि. राजेश खांडवेवर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. दरम्यान विरोधात आदेश दिल्याने २५ मे रोजी सकाळच्या सुमारास पोनि. खांडवेने न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी जात माझ्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश का दिला, अशी विचारणा केली असता यावेळी त्यावर समजावण्याचा प्रयत्न केला व आपिलात जाण्याची संधी आहे, असे न्या. मेश्राम यांनी समजावले. मात्र खांडवेने हुज्जत घालून न्यायाधीश यांना धमकावले. सदर प्रकरण पुन्हा चिघळून त्या प्रकरणी पो.नि.खांडवेविरुध्द कलम ३२३, ३५३, ४५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षकांनी वेगवान हालचाली करून न्या. मेश्राम यांची फिर्यात नोंदवून खांडवे विरुद्ध पोलीस ठाणे चामोर्शी येथे गुन्हा दाखल करून तडकाफडकी निलंबन केले. दरम्यान २ जून रोजी पाे.नि. राजेश खांडवेला उपअधीक्षक साहील झरकर यांनी गडचिरोलीतून ताब्यात घेतले व दुपारी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली व त्यानंतर खांडवेची रवानगी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात करण्यात आल्याचे कळते.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, khandve, chamorshi, atul ganyarpawar)