– कारणे दाखवा नोटीसीतून समाधानकारक खुलासा न दिल्याने कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, ४ जून : आदिवासी आयुक्तांनी आदिवासी आश्रम शाळांमध्ये होत असलेला गैरप्रकार तसेच विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यास कुचराई करून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखविण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत चार अनुदानित आश्रम शाळांची मान्यता रद्द केल्याची बाब पुढे आली आहे. सदर कारवाई ने आश्रम शाळा चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
आयुक्तांनी मान्यता रद्द केलेल्या आश्रम शाळांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील राणी दुर्गावती आदिवासी विकास संस्था संचलित अरततोंडी व परसवाडी, चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील शिवाजी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड जिल्ह्यातील कैलासनगर येथील जनता शिक्षण संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा भोसी, ता. किनवट यांचा समावेश आहे.
होत असलेला गैरप्रकार व इतर समस्येची दखल घेत तिन्ही संस्थांना आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणी घेतली होती. मात्र त्यात समाधानकारक खुलासा न दिल्याने संस्थांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभारी आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी दिल्याचे कळते.
तर आणखी किती आदिवासी आश्रम शाळेत अशाप्रकारचा गैरप्रकार व समस्या आवसून उभ्या आहेत हे सुद्धा शोधणे आवश्यक असून सदर कारवाई ने मात्र आश्रम शाळा चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. ©
(the gdv, the gadvishva, gadchiroli)