गडचिरोली : आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणार सरक्षंण, जिल्हयात विशेष कक्ष कार्यान्वित

661

– पोलिस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती वाहिनी समिती गठीत
The गडविश्व
गडचिरोली, दि.०६ : ऑनर किलींग सारख्या गुन्हयांना रोखण्यासाठी सरकार आता पोलिस बंदोबस्त असलेले सुरक्षागृह अभारणार आहे. जोडप्यांना तिथे निवारा सोबतच सुरक्षा पुरवली जाणार आहे परिस्थतीचे गांर्भीय लक्षात घेवून कमाल एक वर्षापर्यंत सुरक्षागृह पुरविले जाणार आहे. ही सेवा नाममात्र शुल्क घेऊन पुरवली जाणार आहे. देशात ऑनर किंलींग सारख्या घटना मोठया प्रमाणात घडतांना दिसतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शक्ती वाहिनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना सदर आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात यापुढे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने जिल्हयात विशेष कक्ष (Special Cell ) स्थापन करण्यात आले असून पोलिस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती वाहिनी समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे. यामध्ये सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच सदस्य म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे असणार आहे. सदर विशेष कक्ष (Special Cell ) आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहाबदल प्राप्त होणाऱ्या सर्वप्रकारच्या तक्रारींची योग्यरित्या दखल घेवून तात्काळ कार्यवाही करेल तसेच दाखल प्रकरणे, संवेदनशील क्षेत्र याबाबत त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समीती घेईल. आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरुवातीला एका महिण्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येईल. तदनंतर प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेता जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत सुरक्षागृह उपलब्ध करुन देण्यात येईल. तेथे सदर जोडप्यांना पोलिस सुरक्षा व्यवस्था सुद्धा असणार आहे.
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात सहायक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फत गडचिरोली येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी सेवेचा लाभ घेण्याकरीता भरोसा सेल पोलीस अधीक्षक कार्यालय 07132223149, समाज कल्याण विभाग 07132222182 व जिल्हा महिला व बाल विकास विभाग 07132222645 यावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा शक्ती वाहिनी सदस्य सचिव प्रकाश भांदककर यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bharosasel )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here