The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : गडचिरोली शहरातील सुप्रसिद्ध कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळच्या वतीने दुर्गा उत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे. या वर्षी गरबा उत्सवात एक ग्रॅम सोन्याची चपलाकंटी रोज एक विजयी स्पर्धकाला बक्षीस देण्यात येणार आहे.
कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ तर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात येथे नवरात्र उत्सव साजरा होतो. मंडळतर्फे दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. दरवर्षी हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवते. २६ जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. विविध सामाजिक कार्यक्रम सुद्धा घेण्यात येते.
दुर्गा उत्सव त्यांनी निमित्याने अनेक भाविक इथे दर्शनाला येतात. या देवीला नवस बोलला जातो आणि हा पूर्ण होतो असा अनेक भाविकांनी मंडळाला कळविले आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य हे की दरवर्षी, इथे कुणी ना कोणी भाविक नवस पूर्ण झाल्यावर आपल्या परीने तो पूर्ण करतो. दरवर्षी कुणी ना कुणी दुर्गा मातेची मूर्ती भेट देत असतो. यावर्षी सुद्धा देवीची मूर्ती भेट स्वरूपात प्राप्त आहे.
कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते हे मागील २००० साला पासून या चौकामध्ये कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ येथे अमर जवान च्या धरतीवर येथे स्मारक व्हावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश प्राप्त झालेअसून येथे भव्य दिव्य कारगिल स्मारक तयार झालेले आहे, हे स्मारक राज्यात आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.
यावर्षीसुद्धा या मंडळने गरबा दांडिया उत्सव आयोजित केला आहे. नागपूर येथील वेलोकार ज्वेलर्स तर्फे उत्स्कृष्ठ गरबा नूत्य करणाऱ्याला एक ग्रॅम सोन्याची चपलाकंटी बक्षीस देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धाकाला खास कुपन देण्यात येणार आहे.
मंडळचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या कुशल नेतृत्वखाली सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, कोषाध्यक्ष प्रकाश धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, वैभव रामटेके, बाळू गोवर्धन, महादेव कांबळे, संतोष धात्रक, राजू पुंडलिकर,मनीष हांडे, मार्गदर्शक म्हणून कन्हेयासिन्ह बैस, नरेंद्र चन्नावार, सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, मोबीन सय्यद, मोतीराम हजारे, सुभाष माधमशेट्टीवार, सौ.रेखाताई हजारे, सौ सुचिता धकाते, सौ. नीलिमा देशमुख, सौ. वनिता भांडेकर, सौ. विद्या कुमरे, वनिता धकाते, रुपाली शेरके, सौ.मीनाक्षी बिडकर, वनिता वाडिघरे, सौ.शीतल पुंडलिकर, सौ.वंदना लाकडे, संगीता धकाते,आदी सदस्य नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम करीत आहे.
