गडचिरोलीत मोठी चकमक ; डीव्हीसीएम सह १२ नक्षली ठार

6516

– शस्त्रसाठा जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : जिल्हा पोलिस दलाच्या सी -६० जवान आणि नक्षल्यांमधे आज बुधवार १७ जुलै रोजी छत्तीसगड सीमेजवळील वांढोली गावच्या जंगल परिसरात चकमक उडाली. या चकमकीत तब्बर १२ नक्षली ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले असून एका पोलीस अधिकारी व एक सी  ६० जवान जखमी  जखमी झाले आहे.
आज सकाळी १० वाजताच्या सुमारास छत्तीसगड सीमेजवळील वांढोली गाव परिसरात १० ते १५ नक्षली तळ ठोकून असल्याच्या विश्वसनीय माहितीनुसार नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले. यावेळी सी – ६० जवान परिसरात पोहचताच चकमक उडाली. या चकमकीत डीव्हीसीएम लक्ष्मण आत्राम ऊर्फ विशाल आत्राम, टिपागड दलमचे प्रभारी सह १२ नक्षली ठार झाले आहे. घटनास्थळावरून ३ AK47, २ INSAS, १ कार्बाइन, १ SLR यासह ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी मृत नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान या चकमकीत १२ नक्षल्यांना ठार केल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी – ६० जवान आणि गडचिरोली पोलिसांना ५१ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #naxal )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here