The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १७ : जश्ने ईद मिलादुन्नबी यंग मुस्लिम कमेटी कुरखेडाच्या वतीने आज येथील फव्वारा चौकात मोहरम निमित्त आयोजित कार्यक्रमात कुरखेडा पोलीस स्टेशन येथे नव्यानेच रूजू झालेले ठाणेदार महेन्द्र वाघ व साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांचा समाजाचे ज्येष्ठ सदस्य माजी ग्रा.प.सदस्य सईद शेख यांचा हस्ते शाल श्रीफळ व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला.
यंग मुस्लिम कमेटीचा वतीने मोहरम निमित्त शरबत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनियुक्त ठाणेदार महेन्द्र वाघ व सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी येथे भेट देत मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. यावेळी यंग मुस्लिम कमेटीचा वतीने त्यांचा सत्कार करीत शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरीता समाजाचा वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे अभिवचन देण्यात आले.
याप्रसंगी जश्ने ईद मिलादुन्नबी यंग मुस्लिम कमेटीचे अध्यक्ष न्याज़ सय्यद, मार्गदर्शक आसिफ शेख, माजी नगरसेवक उसमान खान, काँग्रेस अल्पसंख्यक आघाडीचे तालुका अध्यक्ष जावेद शेख, साजिद शेख, जमील शेख, शहेबाज शेख, शमीम शेख, शादाब खान मून्ना शेख, शोहेब मस्तान, एजाज शेख, अली अंसारी, आदिल पठान, रेहान खान, बिलाल खाणानी, कासीद कूरेशी, सोहेल पठान, मूजाहिद शेख, समीर शेख, ईरशाद अली, अरशद खान, जम्मू शेख, फैजान पोटीयावाला, मूजम्मील शेख, फाजील शेख, नावेद शेख, फीरोज़ शेख, अशपाक शेख, बाबू शेख, जामीन कूरेशी जोजो खान आदि हजर होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda )