गडचिरोली : मालेवाड्याला मोठी प्रशासकीय भेट? अपर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावावर जनतेचे मत मागविले

119

गडचिरोली : मालेवाड्याला मोठी प्रशासकीय भेट? अपर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावावर जनतेचे मत मागविले
– १५ दिवसांत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, यासंदर्भातील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावाबाबत नागरिक, ग्रामपंचायती तसेच विविध संस्थांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मालेवाडा आणि पुराडा महसूल मंडळांतील गावे समाविष्ट करण्याचा विचार करण्यात आला आहे. या कार्यालयाच्या स्थापनेमुळे परिसरातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभ, जलद आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रस्तावित कार्यालयाच्या निर्मितीबाबत अथवा गावांच्या समावेश व विभाजनासंदर्भात कोणाला हरकत अथवा सूचना असल्यास त्यांनी प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, कुरखेडा यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राप्त अभिप्रायांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी किरण वागस्कर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here