गडचिरोली : रानटी हत्तींचा कळप पोहचला काटली – कोढाणा शिवारात, शेतीचे केले नुकसान

1761

– गावकरी दहशतीत
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : दोन वर्षापूर्वी छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तीने जिल्हाभरात धुमाकूळ माजवला असून सध्यास्थितीत गडचिरोली जिल्हामुख्यालय नजीकच्या काटली – कोढाणा शिवारात दाखल होत शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
रानटी हत्तींचा कळप शुक्रवारी रात्री गडचिरोली तालुक्यातील नवरगावच्या जंगलात प्रवेश केला. दरम्यान रविवारी रात्रीच ते कोढाणाच्या जंगलात पोहोचले. शनिवारी रात्री नवरगाव येथील शेतकऱ्यांच्या धान पिकाचे हत्तींनी प्रचंड नुकसान केले. तर आता हाच कळप काटली – कोढाणा परिसरात पोहचत शेतपिकांचे अतोनात नुकसान केले आहे. काटली – कोढाणा शिवारात हत्तींचा कळप असल्याने नागरिक भयभीत झाले असून जवळपास २० मोठे तर ८ लहान आहे २८ हत्ती काळपात असल्याची माहिती आहे. सदर हत्तीचा कळप आता गडचिरोली जिल्हा मुख्यालयाकडे धाव घेणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला असून वनविभाग त्या कळपावर करडी नजर ठेऊन आहे. धान शेतीचे प्रचंड नुकसान हत्तींकडून केले जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #wildelephant )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here