कुरखेडा-वडसा राष्ट्रीय महामार्गाला झुडपांचा वेढा

294

– कटाई करा शहर विचार मंचाची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २२ : ब्रम्हपूरी -वडसा-कुरखेडा-कोरची राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ अंतर्गत कुरखेडा ते वडसा दरम्यान रस्त्याचा दुतर्फा झाडे झुडपाचा वेढा पडल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. सदर मार्गावर वाढलेल्या झुडपाची छटाई करीत मार्गाला झुडपाच्या वेढ्यातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी शहर विचार मंच कुरखेडा च्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे करण्यात आली आहे.
कुरखेडा- वडसा मार्गावर गेवर्धा ते शंकरपूर या १२ कीलोमीटर अंतरावर घनदाट जगंल आहे. या मार्गावर अनेक ठिकानी डांबरीकरण असलेल्या ठिकाणा पर्यंत झुडपांची वाढ झालेली आहे. रस्त्यावर झुडपे आल्याने वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावलेली आहे. तसेच सरळ मार्गावर सुद्धा समोरील वाहनास साईड देताना किंवा ओवरटेक करताना झुडपे वाहनावर धडकत असल्याने वाहनासह प्रवाशाना धोका पोहचत आहे. सदर अडचण लक्षात घेत तातडीने या मार्गावरील झाडे झुडपांची कटाई करीत मार्गाला झुडपांच्या वेढ्यातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी भ्रमनध्वनीवरून राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता व उपविभागीय अभियंताकडे शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी ,मंचाचे बौद्धिक प्रकोष्ठ प्रमुख रविन्द्र गोटेफोडे, वैद्यकीय प्रकोष्ठ प्रमूख डॉ. जगदीश बोरकर यांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here