गडचिरोली येथे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा मेळावा

91

– स्वस्त धान्य दुकानदार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठीशी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे कार्य नेहमीच विकासाच्या दृष्टीचे राहिले असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, गडचिरोली व धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे प्रतिपादन गडचिरोली येथे झालेल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या मेळावा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना केले.
याप्रसंगी मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, गडचिरोली स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश जी बांबोळे, रामदास पिपरे, मोहन पाल, सुनीता झंझाळ, गेडाम, सुनिल आयतुलवार, चंद्रकांत दरडे, संजय अलोणे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित दुकानदारांना मार्गदर्शन करताना आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव पुढाकार घेतला असून यापुढेही तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी अग्रेसर राहीन असे आश्वस्त केले. या मेळाव्याला परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here