The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑक्टोबर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, आसरअल्ली ता. सिरोंचा येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी यांनी भेट देऊन या शाळेतील शिक्षकांना भेट दिली. यावेळी शाळेतील शिक्षक तथा केंद्रप्रमुख आदर्श शिक्षक पुरस्कृत खुर्शिद शेख यांचीही भेट घेत गुणगौरव व अभिनंदन केले.
शिक्षक खुर्शिद शेख यांना देशाचे राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त झाला असून आदर्श शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊन त्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षणाप्रती त्यांची आवड निर्माण करून देणे हेच या पुरस्काराच्या मध्यमातून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना एक संदेश मिळतो आहे. हा पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण राज्यात गडचिरोली जिल्ह्याचा नाव लौकीक केला आहे. यासाठी त्यांचा गुणगौरव करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, आसरअल्ली येथे माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी आसरल्ली चे सरपंच राजन्ना तैनेनी, सिरोंचा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतिश जवाजी, केंद्रातील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.