The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ ऑक्टोबर : तालुक्यातील निमगाव येथे विर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २१ ऑक्टोबर रोजी गावामध्ये श्रमदान करून स्मृती दिन साजरा करण्यात आला.
वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून निमगाव येथील आदिवासी बांधवांनी श्रमदाना करुन गावात स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली. यात गावातील रस्ते स्वच्छ करून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यात निमगाव येथील आदिवासी समाजाचे अध्यक्ष लालाजी वरखडे, भजन वरखडे, उपसरपंच चेतन सुरपाम, सुरेश शिडाम, पुंडलिक तळोसे, अशोक वरखडे, आनंदराव वरखडे आणि सर्व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.