आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या कडून राजेश येलपुला यांना डायलिसिस उपचारासाठी आर्थिक मदत

153

The गडविश्व
सिरोंचा, २४ सप्टेंबर : नगर पंचायत सिरोंचा येथील वार्ड क्र, ८ मधील राजेश येलपुला हे २ किडनी डायलिसिस या गंभीर आजाराने त्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. उपचार घेण्यास अडचण होत असल्याने राजेश येलपुला यांनी सिरोंचा येथे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगितली. याची दखल घेत आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी दोन किडनी डायलिसिस उपचारासाठी आर्थिक मदत केली.
यावेळी लक्ष्मण बोल्ले, गणेश राच्चावार, किरण चिंताला, आदी- उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here