गडचिरोली : अबब… चक्क नालीमध्ये पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्ह

191

– नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
The गडविश्व
गडचिरोली, २३ सप्टेंबर : शहरातील चामोर्शी मार्गावरील रस्त्यालगत महामार्ग विभागाद्वारा बांधण्यात येत असलेल्या नालीमध्ये चक्क पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व्ह मधोमध आल्याने आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रतापाने मात्र नागरिक संतापले आहे.
गडचिरोली शहरातील चंद्रपूर, धानोरा व चामोर्शी मार्गावर महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. या महामार्गाला लागूनच नालीचेही बांधकाम करण्यात आले असून चामोर्शी मार्गावरील साई नगर वार्ड क्रमांक २१ मध्ये रस्त्याच्या कडेला पाणी पुरवठा करण्यात येणारे व्हॉल्व्ह लावण्यात आला आहे. मात्र आता महामार्गाच्या नालीचे बांधकाम करताना हे व्हॉल्व्ह नालीच्या मधोमध आले आहे. व्हॉल्व्ह मधोमध येत असल्याने काही दिवसांपासून काम बंद होते मात्र आता पुन्हा नालीच्या कामास सुरवात करण्यात आले असून व्हॉल्व्हच्या नालीला मोड देऊन बांधकाम सुरू आहे. नालीच्या मधोमध व्हॉल्व्ह येत असूनही नाली बांधकाम सुरु असल्याच्या प्रकाराने नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला असून तीव्र संताप व्यक्त करत अशाप्रकारे नालीमध्ये व्हॉल्व्ह येत असल्याने आरोग्य धोक्यात येणार असल्याचे मतही व्यक्त केले आहे तर नाली सोडून इतर ठिकाणी सदर व्हॉल्व्ह लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मागील वर्षी याच व्हॉल्व्हमध्ये एका इसमाचा मृतदेह कुजलेल्या असस्थेत आढळुन आला होता. आता पुन्हा या नव्या प्रतापाने मात्र नागरिक चांगलेच संतापले असुन सदर काम थांबविण्या यावे व यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

(the gadvishva, gadchiroli news, nagar parishad gadchiroli, chamorshi road, sai nagar, A drinking water valve in a canal )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here