ग्रामपंचायत गेवर्धा येथे नॅशनल अकॅडेमीच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींचा क्षेत्रीय अभ्यास दौरा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २८ : राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरीसाठी ओळख मिळवलेल्या ग्रामपंचायत गेवर्धा येथे नॅशनल अकॅडेमी ऑफ कस्टम्स, इंडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स (NACIN), पालासमुद्रम, आंध्रप्रदेशच्या विशेष फाउंडेशन कोर्स (SFC) – 2025 अंतर्गत 10 अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या चमूने क्षेत्रीय अभ्यास दौऱ्याचा भाग म्हणून भेट दिली.
भारतीय परंपरेनुसार औक्षण, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. सरपंच सुषमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभेत ग्रामपंचायतीच्या विविध विभागांचा आणि योजनांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला.
या चमूत मेलवीन जेम्स (IIS), जी. साई दर्शनी (IRS-C&IT), सुरभी जैन (IRMS-Account), जयंत गर्ग (IRMS-Traffic), विश्वजीत सिंग होळकर (IRS-IT), हिमांशू (IRMS-Account), शास्वत अग्रवाल (IPS), आदेश शर्मा (IRMS-Traffic), सौरभ कुमार जाट (IFoS) आणि दिपेंद्र प्रित सिंग (IRMS-Account) यांचा समावेश होता.
दौऱ्यादरम्यान प्रशिक्षणार्थींनी महिला ग्रामसंघ कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच प्रधानमंत्री आवास योजना आणि शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची व पारदर्शक कामकाजाची त्यांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमास तहसीलदार धनभाते, प्रभारी गटविकास अधिकारी राजेश फाये, सहाय्यक गटविकास अधिकारी भोगे, विस्तार अधिकारी कुळसंगे, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन सय्यद यांनी केले, तर आभारप्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी देवानंद भोयर यांनी मानले.
ग्रामपंचायत गेवर्धा यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीचा हा दौरा राष्ट्रीय मानांकनाचा गौरव ठरला असून, गावाच्या सर्वांगीण विकासाचे हे प्रेरणादायी उदाहरण बनले आहे.
#thegdv #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews














