डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मान

14

डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मान
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.२९ : श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा येथील उपप्राचार्य तथा भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. गुणवंत गणपती वडपल्लीवार यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुल (जि. चंद्रपूर) येथे आयोजित शिंपी समाज स्नेह मिलन मेळाव्यात चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. वडपल्लीवार हे गेल्या अनेक वर्षांपासून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात भूगर्भशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच उपप्राचार्यपदाची जबाबदारीही ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून वर्ग-१ अधिकारी पदावर १२ वर्षे सेवा बजावली आहे.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, रोजगार मार्गदर्शन केंद्र, सांस्कृतिक विभाग, नाट्य प्रशिक्षण शिबिर आणि विद्यार्थी कल्याण विभाग यांसह विविध शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या ते प्रभावीपणे पार पाडत आहेत. त्यांच्या नावावर भूगर्भशास्त्र विषयातील २० हून अधिक संशोधन निबंध, दोन पुस्तके तसेच दोन पेटंट प्रकाशित झाल्याची माहिती आहे.
अभ्यासू प्राध्यापक आणि उत्साही संशोधक म्हणून डॉ. वडपल्लीवार यांची परिसरात ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांना देशात तसेच परदेशात रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
त्यांना मिळालेल्या समाजभूषण पुरस्काराबद्दल दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, प्राध्यापकवृंद तसेच मित्रपरिवाराने अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here