गडचिरोलीत उद्या जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सव’

19

गडचिरोलीत उद्या जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सव’
– रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री; नागरिकांना भेट देण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक व आरोग्यविषयक महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी कृषी चिकित्सालय, शासकीय रोपवाटिका, सोनापूर, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
रानभाज्यांमध्ये विविध पोषक व औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा आहारातील वापर आणि महत्त्वाबाबत जनजागृती करणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
जिल्ह्यातील शेतकरी, महिला व शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महोत्सवात सहभागी व्हावे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन रानभाज्यांची ओळख व महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here