धानोरा : व्हॉईस ऑफ मिडियाचे धरणे आंदोलन, तहसीलदारांना पत्रकारांच्या विविध मागण्याचे निवेदन

224

– तालुका काँग्रेस कमेटी धानोरा यांचे पत्रकारांच्या मागण्यासाठी समर्थन
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ११ मे : वृत्तपत्र माध्यमाकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते. मात्र माध्यमाचे प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने प्रयत्न आता पर्यत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले त्याच्या एक भाग म्हणून विविध मागण्याचे निवेदन गुरुवार ११ मे रोजी धानोरा शाखेच्या वतीने तहसीलदार वीरेंद्र जाधव परि.उपजिल्हाधिकारी धानोरा यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांना भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेल्या जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करणे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण व वर्ग दैनिक यांना मारक आहे लघु दैनिकांनाही मध्यम दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात साप्ताहिकानाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात आदि मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून व्हॉइस ऑफ मीडियाच्या न्याय मागण्यासाठी तालुका काँग्रेस कमेटीने समर्थन दिल्याने व्हॉइस ऑफ मीडिया धानोरा च्या सर्व सभासदांनी आभार मानले.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया धानोरा चे अध्यक्ष शरीफ कूरेशी, उपाध्यक्ष भाविकदास करमनकर, समीर कूरेशी -उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष दिवाकर भोयर, सीताराम बडोदे, श्रावण देशपांडे, बंडू हरणे, अरूण चापले, देवा कुणघाटकर, मारोती भैसारे, ओम देशमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here