– मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात मोठा दिलासा
The गडविश्व
नरेश ढोरे / आरमोरी, ११ मे : शासन हमीभाव देऊन मका खरेदी केंद्र सुरू करणार आहे त्यामुळे आता मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात मोठा दिलासा मिळाला आहे. तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे तसेच उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
शासकीय हमीभाव देऊन मका खरेदी केंद्र सुरू न केल्यास ट्रॅक्टर मध्ये भरलेला माल १२ मे रोजी आम्ही तहसील कार्यालयात विक्रीसाठी आणू व रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे तसेच उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी शासनाला दिलेल्या निवेदनातून केला होता. या निवेदनाची दखल घेत शासनाने शासकीय आधारभूत किमतीवर मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश काढलेले आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांनी आपला माल मका खरेदी केंद्र सुरू होईपर्यंत व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकू नये असे आवाहन दिलीप घोडा यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे शासन हमीभावावर मका खरेदी करीत असतो. या उद्देशाने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली परंतु यावर्षी वातावरणाचा लहरीपणामुळे मका पिकाची वादळ वारा व अवकाळी पाऊस त्यामुळे खूप मोठी नासाडी झालेली आहे तरी शेतकरी हताश न होता जसे येईल तसे पीक घेऊन शासकीय खरेदी केंद्र चालू होण्याची वाट पाहत आहेत. मे महिना सुरुवात होऊनही खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी हतबल झालेले दिसून येत होते याची दखल घेत मिलिंद खोब्रागडे आणि दिलीप घोडा यांनी आक्रमक पवित्रा घेतला एक निवेदन देऊन १२ मे पर्यंत मका खरेदी केंद्र सुरू न झाल्यास ट्रॅक्टर मध्ये भरलेला माल थेट तहसील कार्यालयात विक्रीसाठी आणू असा इशारा वजा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाची दखल घेऊन शासनाने मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश काढले आहे.