दिभना येथील दारूविक्रेत्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन

88

– मुक्तिपथ गाव संघटनेच्या सदस्यांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, ११ मे : तालुक्यातील दिभना येथील दारूविक्रेत्यांना कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा गाव संघटनेच्या सदस्यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस निरीक्षकांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मागील दीड वर्षांपासून गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला व गावात दारूबंदी करण्यात आली. पण काही दारू विक्रेत्यांनी गावाच्या निर्णयाला न जुमानता अवैध दारूविक्री करीत आहेत. त्यांना दारूबंदी करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. सोबतच पोलिस विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कार्यवाही देखील करण्यात आली. तरीसुद्धा गावातील मुजोर विक्रेते अवैध व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था टिकविण्यास अडचण होत आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गाव संघटनेच्या सदस्यांनी गडचिरोली पोलिस स्टेशन गाठून उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. तसेच निवेदनाची दखल घेऊन दारूविक्रेत्यांवर कारवाई न केल्यास पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर गावातील दारूबंदी होईपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

(The gdv, the gadvisha, gadchiroli news updates, muktipath serch, dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here