धानोरा तालुक्यात कोतवाल पदभरती : रिक्त पदांकरीता अर्ज आमंत्रित

2313

The गडविश्व
ता प्र / धानोरा, ३० जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका अंतर्गत कोतवाल पदभरती पेसा अंतर्गत १३ रिक्त असलेल्या जागांकरिता पदभरती करावयाची आहे़. त्यात कन्हालगाव, मेंढा, कामथळा, कोसमी, दुधमाळा, देवसुर, चर्विदंड, कटेझरी, मोहली, येरकड, पुलखल, मुंजालगोंदी, निमगाव या १३ गावाकरिता जाहीरनाम्यात नमुद स्थानिक अनुसूचित जमाती व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील आवश्यक अर्हता धारक व्यक्ती कडून पारंपारिक (ऑफलाईन) पध्दतीने अर्ज १ ते १० ऑगस्ट २०२३ पर्यंत मागविण्यात येत आहे.
विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध असून सदर कोतवाल पदभरती २०२३ बाबतचा सविस्तर जाहिरनामा तहसील कार्यालय धानोरा, पंचायत समिती धानोरा, नगरपंचायत धानोरा संबंधित गावाचे ग्रामपंचायत कार्यालय व संबंधित गावचे तलाठी कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर ३१ जुलै २०२३
रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी स्थानिक उमेदवारांनी पात्रतेच्या अटीनुसार ऑफलाईन पध्दतीने परीक्षा शुल्कासह अर्ज तहसील कार्यालय धानोरा येथे सादर करावे असे आवाहन सदस्य /सचिव, कोतवाल निवड समिती तथा तहसिलदार धानोरा यांनी केले आहे.

(the gadvishva, the gdv, kotval, gadchirolo news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here