धानोरा : सुजल रोहनकारची संभाजी नगर मेडिकल कॉलेज करिता निवड

134

धानोरा : सुजल रोहनकारची संभाजी नगर मेडिकल कॉलेज करिता निवड
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : तालुक्यातील रांगी येथील सुजल मनोहर रोहनकार ला संभाजी नगर येथील रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या या यशावर गावातील नागरिक आणि कुटुंबीय अभिनंदन व्यक्त करत आहेत.
अतिदुर्गम भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील सुजल रोहनकार यांनी NEET परीक्षेत 720 पैकी 493 गुण मिळवून आपल्या मेहनतीचे फळ मिळवले. ओबीसी कुटुंबातील असल्यामुळे MBBS अभ्यासक्रमासाठी संधी मिळेल की नाही, याची शंका होती मात्र अखेर त्याला संधी मिळाली.
वडीलाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना, सुजलने शिक्षणाची जिद्द कधीच सोडली नाही आणि आता त्यांनी MBBS शिक्षण सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी दर्शविली आहे. त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक समाज, शिक्षक व कुटुंबीय सर्वत्र कौतुक करत आहेत.
सुजल रोहनकारचे हे यश अशा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे जे आर्थिक अडचणी असूनही उच्च शिक्षण साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here