– संस्थेवर कारवाई कधी होणार ? नागरिकांचा प्रश्न
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ फेब्रुवारी : तालुक्यातील सावरगाव धान्य खरेदी केंद्राला हंगाम २०२१-२२ मध्ये आलेल्या घटिबाबत उपप्रादेशिक व्यवस्थापक धानोरा यांनी संस्थेचे अध्यक्ष /सचिव, केंद्रप्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याने खळबळ माजली आहे.
उपप्रादेशिक कार्यालय धानोरा च्या वतीने नोटिस बजावताना म्हटले की, हंगाम २०२१-२२ मधील आधारभूत खरेदी योजना अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था सावरगावला धान खरेदी केंद्र म्हणून मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार धान्य खरेदी केंद्रावर वजन ११६०१.६० क्विंटल पोते २९००४ नग बारदाण्यामध्ये खरेदी केले होते. खरेदी करण्यात आलेल्या धान्य साठ्यात पैकी भरडाईस वजन ७८११.८६ क्विटल पोते २१००१ नग जावक झालेला असून साठा पुस्तकाप्रमाणे वजन ३७८९.७४ क्विंटल धान्य साठा शिल्लक दिसत आहे. परंतु आपले खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष शिल्लक धान्य साठा ८००३ पोती दिसून येत असून आपले खरेदी केंद्रावरील जावक झालेल्या धान्य साठ्यात मोठ्या प्रमाणात घट आल्याचे दिसून येत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे तेव्हा आपले खरेदी केंद्रावर जावक झालेल्या धान्यसाठा मध्ये मोठ्या प्रमाणात घट आल्याचे दिसून येत आहे. खरेदी केंद्रावर जावक झालेल्या धान्यसाठ्यामधे मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच खरेदी केंद्रावर शिल्लक असलेल्या धान्य साठ्याचे डी.ओ .प्राप्त असून सुद्धा भरडाईस जावंक का ? झालेला नाही याबाबत आपण कार्यालयास स्वयं स्पष्ट खुलासा सादर करावा. आपला खुलासा अप्राप्त असल्यास किंवा असमाधानकारक असल्यास आपण शासनाचे व महामंडळाचे आर्थिक नुकसान केल्याबाबत आपले वर व संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी अशी नोटीस सावरगाव संस्थेला १३-१५ जानेवारी २०२३ रोजी पाठविण्यात आल्याने तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले असून या संस्थेवर फौजदारी कारवाई कधी करण्यात येणार ? असा प्रश्न करीत आहे.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Bard AI) (Aaron Finch) (Hogwarts Legacy) (Victoria Gowri) (Ravi Shastri) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Dhanora) (Savargaon)