धानोरा : जि.प. हायस्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

428

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २९ नोव्हेंबर : जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक पी. व्ही.साळवे तर प्रमुख अतिथी ए.बी. कोल्हटकर, एस.एम. रत्नागिरी, श्रीमती संगीता निनावे मॅडम, एस.पी.हेमके, कु.रजनी मडावी होते.
कार्यक्रमाची सूरवात माता सरस्वती आणि ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी वर्ग दहावीची विद्यार्थिनी कू.श्रेया मोहूर्ले आणि श्रुती मोहुर्ले यांनी सावित्रीबाई तसेच ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगानुरूप गीत सादर केले. वर्ग ५ ते १२ च्या २३ विद्यार्थ्यांनी ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर भाषण आणि समूह गीताच्या माध्यमातून प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी निनावे मॅडम यांनी सुंदर कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सत्यशोधक समाज याबद्दल माहिती दिली आणि नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारून जीवन उज्वल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन दर्शन कुंभारे आणि अभय चौरका तर आभार कु.अनामिका गुरनुले हिने मानले.
कार्यक्रम यशस्वी करणेकरिता वर्ग १० ब च्या विद्यार्थ्यांनी तसेच वर्गशिक्षक पी बी. तोटावार यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here