इंदिरा गांधी महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी साजरी

217

The गडविश्व
गडचिरोली, २९ नोव्हेंबर : इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली येथे २८ नोव्हेंबर २०२२ ला महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ लिपिक सुनील गोंगले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.दिपक ठाकरे , प्रा. हर्षल गेडाम , प्रा. विशाल भांडेकर उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करत असताना सुनील गोंगले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनातील कार्यावर प्रकाश टाकले आणि “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ” असे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या प्रसंगी संचालन प्रा. विशाल भांडेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दिपक ठाकरे यांनी मानले. यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here