The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २९ नोव्हेंबर : श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात २७ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय पर्व घोषित केलेले आहे. त्या अनुषंगाने संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून संविधान यात्रा काढण्यात आली. संविधानाची उद्देशिका मूलभूत हक्क , कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत निबंध स्पर्धा व भिंती पत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांचे अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. तसेच समान संधी केंद्राचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून विचारधारा टिकवून ठेवण्यासाठी संकल्प करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी समायोजित भाषणे केले.
संचालन व प्रास्ताविक प्राध्यापक ज्ञानेश बनसोड तर आभार डॉ. प्रियंका पठाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
