The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २९ नोव्हेंबर : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महामविद्यालय धानोरा येथे समान संधी केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले.
रॅली ची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. सदर रॅली महाविद्यालयापासून पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहारापर्यंत नेण्यात आली. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृती संदर्भात विविध घोषणा देऊन संविधानाविषयी जागृती केली.
याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. किरमिरे, डॉ. चौधरी, डॉ. वाघ, डॉ. लांजेवार, डॉ. जंबेवार, डॉ. झाडे, डॉ. गोहणे, डॉ. धवनकर, प्रा, बनसोड, प्रा. तोंडरे, प्रा. पुण्यप्रेड्डीवार, प्रा. वाळके, प्रा. भैसारे, प्रा. करमणकर, डॉ. पठाडे इत्यादी कर्मचारी रॅलीत सहभागी होते.
बौद्ध विहारात रॅलीला संबोधित केल्यानंतर महाविद्यालयात रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी समान संधी केंद्राचे सर्व पदाधिकारी कार्यकारणीतील सर्व विद्यार्थी, सदस्य आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीचे संपूर्ण सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश बनसोड तर आभार प्राध्यापक डॉ. पथाडे यांनी केले.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)