– घातपाताची शक्यता
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ०७ : तालुक्यातील रांगी येथे ताडाम यांच्या शेतात आज ७ जानेवारीला सकाळच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मनोहर नथ्थुजी आत्राम (अंदाजे वय ६५) रा.कन्हाळगाव असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहिती नुसार नाजुकराव ताडाम यांच्या शेतात घर बांधकामाकरिता आवश्यक वीटा बनविण्याचे काम सुरू असून कन्हाळगांव येथिल मनोहर नथ्थुजी आत्राम व जयदेव हलामी हे दोघेही रात्री जेवन करुन ताडाम यांच्या शेतात नियमित कच्या विटा बनवित होते. काल शनिवार ६ जानेवारी ला जेवन उरकून शेकोटी च्या बाजूला झोपले. एक खाली दुसरा मात्र मचानवर झोपला असताना शेकोटी पेटत तनसिला आग लागली आणि त्यात मनोहर आत्राम हा व्यक्ती जळालेल्या अवस्थेत आढळला तर दुसऱ्यास कोणतीही ईजा झालेली नाही. घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेत घातपात तर नसावा अशी शंका नागरिकांकडून करण्यात येत आहे. मृतक हा दारू पिऊन होता ? माणसाला विस्तवाचा चटका जरी लागला तरी मनुष्य प्राण वाचविण्यासाठी धडपडत असतो मात्र हा व्यक्ती जळत पर्यंत तिथे कसा आणि दुसऱ्या व्यक्ती
ला मात्र काहीच झालेले नाही त्यामुळे आणखी शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या जात आहेत. कुठेतरी संशयाची पाल लोकांच्या मनात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.