देसाईगंज : वीज पडून मृत्यू झालेल्या मृतक कुटुंबियांच्या नातेवाईकांना १६ लक्ष रुपयांचा धनादेश सुपुर्द

3843

-आमदार कृष्णा गजभे यांची उपस्थिती, केले सांत्वन
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २५ एप्रिल : वीज पडून आमगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार २४ एप्रिल रोजी देसाईगंज तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या दूध डेअरी जवळ घडली. मृत पावलेल्या भारत लक्ष्मण राजगडे यांच्या कुटुंबियांना आमदार कृष्णा गजबे, उपविभागिय अधिकारी जे पी लोंढे, तहसिलदार प्रियेश महाजन, नायब तहसिलदार राम नैताम यांच्या हस्ते १६ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला.
२४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भारत राजगडे, पत्नी अंकिता, मुलगी देवांशी व मनस्वि लग्न समारंभ आटोपून परत येत असतांना देसाईगंज तुळशी फाटा जवळ वादळ आल्याने त्यांनी झाडाचा आसरा घेतला होता. मात्र काळाने घाला घातला व राजगडे कुटुंबियांवर वीज कोसळल्याने कुटुंबातील चारही जण जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे, उप विभागीय अधिकारी लोंढे तहसीलदार महाजन यांनी मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वन देत शासकिय तरतुदीची प्रक्रिया पुर्ण करुन प्रति मृतकांना ४ लाख रुपये प्रमाने ४ मृतकांचे १६ लक्ष रुपयाचा धनादेश मृतकाची आई पुष्पा लक्ष्मन राजगडे, बहिण अंजु गडपायले, प्रिती केळझरकर, स्मिता भोसकर यांना बहाल केला. या प्रसंगी माजी सरपंच योगेश नाकतोडे, अनिल निकम यांचेसह गावकरी उपस्थित होते.

(The gadvishva the gdv gadchiroli news updates desaiganj)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here