– ‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची ‘बोल हरी बोल’मध्ये भन्नाट केमिस्ट्री!
The गडविश्व
मुंबई, २५ एप्रिल : हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ एक नवा कोरा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. मराठी बिगबॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर, चतुरस्त्र अभिनेते रमेश वाणी आणि ‘नागपूर सुंदरी’ हा किताब मिळविणारी अभिनेत्री आकांक्षा साखरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलपासून एक्स्क्लुझिवली ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पहायला मिळणार आहे. निर्माता सुशीलकुमार अग्रवाल यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.
प्रेम, क्षमा आणि दुसऱ्या संधीची हृदयस्पर्शी कथा म्हणजे चित्रपट ‘बोल हरी बोल’. स्वतःच्या सुखवाहू जीवनाची स्वप्न पाहताना, वडिलांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हरी पोंक्षेच्या जीवनावर चित्रपटाची कथा आधारीत आहे. हरीचे वडील, मनोहर पोंक्षे हे सरकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असून, ते एका चाळीत राहतात. मुंबईत स्वत:चा फ्लॅट घेण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि हरीने त्याचे हे स्वप्न पूर्ण करावे अशी त्याची इच्छा आहे. परंतु बाप-लेकाची हि जोडी शेरास-सव्वाशेर आहे. त्यामुळे हि स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच एकमेकांच्या स्वभावासोबत जुळवून घेण्यासाठीची धडपड आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
“कलाकारांची उत्तम फळी लाभलेला ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाचे अनोखे कथानक आणि उत्तम संदेश सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र ट्रेंड होत असून चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता वाढली असून, येत्या २८ एप्रिल रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया ‘अल्ट्रा झकास’च्या वतीने व्यक्त केली जात आहे.
दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनिक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे.
‘बोल हरी बोल’ चा ट्रेलर पहाण्यासाठी
https://www.facebook.com/UltraJhakaas/?mibextid=RUbZ1f&ti=as
https://www.instagram.com/ultrajhakaas/?igshid=YmMyMTA2M2Y%3D
https://www.youtube.com/@ultrajhakaas
https://twitter.com/ultrajhakaas