– नागरिकांनी सावधानता बाळगावी
The गडविश्व
गडचिरोली, २५ एप्रिल : हवामान विभागाने नागपुर विभागात आजपासून पुढील पाच दिवस येलो अलर्ट जारी केला असुन नागरिकांनी सावधानता बाळगावी.
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयात विजांच्या कडकडाटेसह मेघगर्जना वादळ वारा व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. गडचिरोली जिल्हयाला २५ एप्रिल रोजी ‘ऑरेंज’ अलर्ट तर पुढील चार दिवस मात्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान गडचिरोली जिल्हयाला ऑरेंज अलर्ट जारी केला असल्याने जिल्हयातील नागरिकांना अधिकच सतर्कता बाळगावी लागणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता उचित खबरदारीही घेण्यात यावी.
गडचिरोली जिल्हयात २४ एप्रिल रोजी देसाईगंज तालुका मुख्यालयापासुन जवळच कुरखेडा मार्गावर हलका पाउस सुरू झाल्याने झाडाचा आडोश्याला असतांना झाडावर विज पडल्याने आडोशाला असलेल्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हवामान विभगााने वर्तविलेल्या अंदाजानुसार विजांचा कडकडाट, मेघगर्जना व पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने नागरिकांनी अधिकच सतर्क राहणे आवश्यक आहे .
(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (Bayern vs Man City) (Inter vs Benfica) (JEE MAINs Answer Key) (Mohammed Siraj) (Solar eclipse of April 20, 2023) (Roman Reigns) (Mamata Banerjee) (The Song of Scorpions) (BEWARE, BE ALERT: YELLOW ALERT FOR FIVE DAYS AGAIN)