निकालापूर्वीच परीक्षा फॉर्म ? गोंडवाना विद्यापीठात भोंगळ कारभाराची मालिका सुरूच

105

– परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख वाढविण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, २५ एप्रिल : येथे असलेल्या गोंडवाना विद्यापीठात भोंगळ कारभाराची मालिका सुरूच असून विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच परीक्षा फॉर्म भरण्यास सांगितले जात असून विद्यार्थ्यांनी निकाल लागण्यापूर्वीच फॉर्म भरायचा तरी कसा ? असा प्रश्न उपस्थित होत असून परीक्षा फॉर्म भरण्याकरिता मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी अभावीप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांनी केली आहे.
२० एप्रिल ला अभाविप च्या वतीने करण्यात आलेल्या घंटा नाद आंदोलना नंतर ही विद्यापीठात भोंगळ कारभाराची मालिका अजूनही सुरूच आहे. आंदोलना नंतर दिलेल्या चुकांची पूर्तता पूर्ण करणे तर दूरच आणखी नवीन समस्या विद्यार्थांनं समोर निर्माण झाल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले असल्याचे शक्ती केराम यांनी म्हटले आहे. MbA प्रथम व तृतीय सेम चा निकाल आद्यपही लागलेला नाही. अश्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे आवेदन पत्र कधी भरावा असा मोठा प्रश्न पडला असून MBA च्या प्रथम सत्र परीक्षेच्या वेळापत्रकात हिंदी साहित्यचा विषय समाविष्ट केला गेल्याने असे जाणवते कि खरच विद्यार्थी केंद्रित विद्यापीठ आहे काय ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम करणारा हा प्रकार समोर आला आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठातील परीक्षा विभागात विचारणा केली असता प्रशासनाकडून उडवा उडवीचे उत्तर मिळतात. असे सांगितले जाते कि निकाल लागला आहे परंतु पोर्टल ला कुठे ही दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करायचे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेता परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढवून देण्यात यावी अशी मागणीही अभाविप करीत आहे. व कुठलाही विद्यार्थी परीक्षे पासून वंचित राहणार नाही याची काळजी विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी, जर एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही विद्यापीठाची असेल आणि असे झाल्यास अभाविप तीव्र आंदोलन करेल असा इशारा अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here