कुरखेडा येथे संविधान दिन उत्साहात साजरा

5

कुरखेडा येथे संविधान दिन उत्साहात साजरा
– संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २६ : भारतीय संविधान दिनानिमित्त कुरखेडा येथील नगरसेवक ॲड. उमेश वालदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (२६ नोव्हेंबर) संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला होता. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक ॲड. उमेश वालदे, सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय चौधरी, एकनाथ जांभूळकर, सोनू चौधरी, दिलीप सोरते, भावेश मुंगणकर, दिलीप रोकडे, खुशाल रामटेके, रमेश कवाडकर, सोनू गुवाल, गोवर्धन तंगेल्लीवार, मुकेश वालदे, दिनेश कोहाळकर, सूरज गावतुरे, शुभम सहारे, संतोष राऊत आदी उपस्थित होते.
#thegdv #thegdv #ConstitutionDay #Kurkheda #DrBabasahebAmbedkar #IndianConstitution #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here