The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही सणांच्या मिरवणुकीदरम्यान शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात लेझर लाईटच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्वल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(१) अंतर्गत हा आदेश जारी केला. मागील वर्षी कोल्हापूर येथे लेझर लाईटमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापती आणि यवतमाळ जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण झालेल्या घटनांचा अनुभव लक्षात घेऊन ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
ही बंदी ५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत लागू राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
#the #thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #latestnews













